आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:'अमोल भावा तू नवीन आहेस, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार'- चित्रा वाघ

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'वाघाची' डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती'-अमोल मिटकरी

पुजा चव्हाण प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन टीका केली होती. यानंतर आता चित्रा वाघ यांनी मिटकरींना प्रत्युत्तर दिले आहे. 'अमोल मिटकरी राजकारणात अजून नवा भिडू आहे. नवीन आमदार झालाय, चांगले काम कर. बाकी माझे आणि माझ्या बापाचे(शरद पवार) काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार', असे वाघ चित्रा वाघ म्हणाल्या.

पुजा चव्हाण प्रकरणात नाव अलेले शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांचा आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. याबाबत आज चित्रा वाघ यांनी सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये गुन्हा दाखल केला. यानंतर माध्यमांशी संवाध साधताना चित्रा वाघ यांनी अमोल मिटकरींवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, 'अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती? तुला आमदारकी दिली आहे पक्षाने, नेटाने काम कर. चांगला आवाज आहे बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील. यावर बोलून फार महत्त्व देण्याची गरज नाही', असे चित्रा वाघ म्हणाल्या.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी ?

'वाघाची' डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती, पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळी सुद्धा हवेत कशी विरून जाते हे ही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते,' अशी टीका मिटकरी यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...