आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर पलटवार:म्हणाले- बाळासाहेब ठाकरे असते तर एक थोबाडीत लगावली असती; कंगनाचे विधान चुकीचेच पण...

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरात मशीद पाडल्याच्या कथित वृत्तानंतर त्याचे पडसाद मालेगावमध्ये उमटणे यापेक्षा शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याची मला खूप कीव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल, असा जाब विचारत आज स्व. बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर एक थोबाडीत मारली असती, या शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

राज्य करा, मुस्लिमांची मते मिळवा, 95 टक्के मुसलमान हा देशप्रेमी आहे. मात्र, 5 टक्के मुसलमान धार्मिक चिथावणीला बळी पडून हे करतो. त्याच्यावर तुम्ही टीकाही करणार नाही? प्रत्येक विषयात झोपताना उठताना तुम्हाला भाजपाच दिसतोय, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आणखी काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
रझा अकादमी भाजपचे पिल्लू आहे यावर म्हणाले की, सगळ्या गोष्टी आमच्याच आहेत का? काय सुरु आहे ही चेष्टा? प्रत्येक ठिकाणी भाजपचाच हात असतो का? एवढ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्त्या झाल्या तरी भाजपचाच हात? तीन पक्ष एकत्र असून तुम्ही दुबळे आहात. सरकार अपयशी आहेत. माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत, आजी गृहमंत्री आता आजारातून उठलेत तर मुख्यमंत्री दवाखान्यात आहेत. सध्या राज्य बाहेरुन चालवले जाते आहेत.

कंगनाचे विधान चुकीचे पण मोदी सरकारविषयी वक्तव्य बरोबर -
देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले, असे वादग्रस्त विधान कंगनाने केले होते. तिच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. पाटील म्हणाले, ते विधान चुकीचेच आहे. त्याचे समर्थन करणार नाही पण मोदी सरकारसंबंधीचे विधान काही अंशी बरोबरही आहे, असेही पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...