आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात दिवसभरात 5,031 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 4,380 कोरोनामुक्त, तर 216 जाणांचा मृत्यू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात आज दिवसभरात 5 हजार 31 नव्या कोरोनाबाधितांच नोंद झाली आहे. तर 4 हजार 380 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर 216 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सध्या 50 हजार 183 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत 62 लाख 47 हजार 414 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.04 टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात 50 हजार 183 सक्रिय रुग्ण
आजपर्यंत एकूण 1,36,571 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 28 लाख 40 हजार 805 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 37 हजार 680 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 98 हजार 264 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात 50,183 सक्रिय रुग्ण आहेत.

या जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या 100 च्या आत

जळगाव (41), नंदूरबार (1), जालना (85), परभणी (21), धुळे (17), हिंगोली (61), नांदेड (34), अमरावती (93), अकोला (21), वाशिम (10), बुलढाणा (34), यवतमाळ (6), नागपूर (97), वर्धा (4), भंडारा (6), गोंदिया (4), गडचिरोली (25) या जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या शंभरच्या आत आली आहे.

बातम्या आणखी आहेत...