आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनाम्यानंतर वेगवान हालचाली:गृहमंत्रीपदाच्या राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख दिल्लीत, सीबीआय चौकशी टाळण्यासाठी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवींची घेतली भेट

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची माहिती दिली होती.

अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. सीबीआय चौकशी टाळता यावी यासाठी त्यांनी दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा दरम्यान चर्चा केली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या घडामोडी घडल्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सीबीआय चौकशी टाळण्यासाठी अनिल देशमुखांनी दिल्लीला रवाना झाले. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टातले वकील राहुल चिटणीस आणि एक वकिलांची टीमही या ठिकाणी हजर होती. हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता यानंतर काय करता येईल याविषयीवर या बैठकीत चर्चा झाली. आता यानंतर त्यांचे पुढचे पाऊल काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यासंदर्भात 15 दिवसांत अहवाल सादर करावा लागणार
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या वसुलीच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिले. सीबीआयला यासंदर्भात 15 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले. यानंतर अडचणीत सापडलेल्या अनिक देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली होती.

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची माहिती दिली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली, या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. यावेळी अनिल देशमुखांनीच पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवारांनी होकार दिला. यानंतर देशमुखांनी राजीनामा दिला. तसेच, सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणे योग्य नसल्याचे सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे मलिक यांनी सांगितले होते.

दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या गृहमंत्री पदाची माळ राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या गळ्यात पडली आहे. दिलीप वळसे पाटलांकडे सध्या उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी होती, त्यातील कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...