आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Anil Deshmukh's Appearance Before The Enforcement Directorate Today News And Update. The Fifth Summons Has Been Issued After The Dismissal Of The Petition From The Supreme Court

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण:अनिल देशमुख पाचव्यांदा ईडीसमोर गैरहजर, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर बजावण्यात आला होते समन्स

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि देशमुख यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आज पाचव्यांदा अनिल देशमुख अंमलबजावणी संचालनालयासमोर गैरहजर राहिले आहे. यापूर्वी चारीही वेळेस त्यांचे वकील इन्‍द्रपाल सिंह यांनी ईडी ऑफिसात हजेरी लावली होती. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी देशमुख यांना मोठा झटका दिला. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने देशमुख यांच्या वरील ईडीची चौकशी थांबवण्यास नकार दिला आहे. त्यानंतर देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनरयाचिका दाखल केली आहे.

देशमुख यांच्या दोन्ही पीएला अटक
अंमलबजावणी संचालनालयने यापूर्वी देशमुख यांचे दोन्ही पीएला अटक केली होती. दरम्यान, देशमुख यांचे वाढते वय आणि आरोग्य संबंधित समस्या यामुळे ईडी समोर हजर राहता येणार नाही असे त्यांचे वकील इन्‍द्रपाल सिंह यांनी सांगितले आहे.

4.7 कोटीची संपत्ती जप् अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांची चौकशी केली आहे. ईडीने देशमुख यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले असून आतापर्यंत 4.20 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी देशमुख यांच्यावर वसुलीच्या आरोप केलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...