आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Anil Parab Statement About Sachin Zaze Allegation 'I Swear By Balasaheb Thackeray And My Two Daughters, It's All A Lie'

अनिल परब यांचे स्पष्टीकरण:'मी बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, हे सगळ खोटं आहे'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाही

अँटिलिया प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने बुधवारी माजी पोलिस उपनिरिक्षक सचिन वाझेंना विशेष न्यायालयात हजर केले होते. यावेळी सचिन वाझेंनी कोर्टासमोर एक पत्र सादर केले. या पत्राद्वारे त्यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. यानंतर अनिल परब यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिले आहे.

याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले की, 'सचिन वाझेंनी पत्रात माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. पण, मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, वाझेंनी केलेले आरोप खोटे आहेत. वाझेंनी माझ्यावर जून-ऑगस्ट 2020 ला SBUT ट्रस्टीकडून 50 कोटी घेण्याचा आणि जानेवारी 2021 ला मुंबई महापालिका कंत्राटदाराकडून 2 कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्याचा आरोप केला आहे. पण, या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत, माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाही. मला बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत', अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.

परब पुढे म्हणाले की, 'भाजप नेते आम्ही तिसरा बळी घेऊ, असे म्हणत होते. त्यामुळे भाजपने हे बनवलेले प्रकरण आहे. वाझे हे पत्र देणार आहे, हे भाजपला आधीपासून माहीत होते. म्हणूनचे भाजपवाले गाजावाजा करत होते. माझ्यावर केलेले हे आरोप खोटे आहेत. मी आज कुठल्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना बदनाम करण्याचा हा डाव आहे. माझी नार्को टेस्ट केली तरी मी सामोरा जायला तयार आहे,'असे परब म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...