आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राजस्थानच्या अलवरमधील भाजपच्या जन आक्रोश सभेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या सभेत काही महिलांना नाचवण्यात आले होते. यावरुन अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांना सवाल विचारत भाजपवर टीका केली आहे.
गेल्या काही दिवलात उर्फी जावेद प्रकरणावरुन चित्रा वाघ संतप्त झाल्या आहेत. उर्फी जावेदचा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही म्हणत चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. उर्फीनेही मी असाच पेहराव करेल म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकरणावरुन दोघींमध्ये वार-पलटवार होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाल्या दमानिया?
अंजली दमानिया यांनी राजस्थानच्या अलवरमधील भाजपच्या जन आक्रोश सभेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. प्रिय चित्राताई वाघ, भाजपच्या रमेश बिधुरी यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? याला आपण कुठली संस्कृती म्हणाल? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का?, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
व्हिडिओत काय?
राजस्थानच्या अलवरमध्ये भाजपची जन आक्रोश महासभा पार पडली. या सभेत महिलांना नाचवण्यात आले होते. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता हाच व्हिडीओ रिट्विट करून अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांना सवाल केला आहे. यात चित्रा वाघ यांनाही टॅग केले आहे.
अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद घेतली. ती बघून दु:ख झाले. मला त्यांच्याबद्दल आदर होता. संजय राठोडा यांच्याविरोधात त्या लढल्या. मात्र राजकारणात कमबॅक करण्याचा, स्व:तचे अस्तित्व निर्माण करण्याचा किंवा मंत्रीपद मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता.
कंगना-अमृता फडणवीसांवर बोलणार का?
पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, काल संध्याकाळी मी जन आक्रोश सभेचा व्हिडीओ पाहिला तेव्हा राहवले नाही. राजस्थानमध्ये जनआक्रोश महासभा घेण्यात आली. त्यात तरुणी नाचत होत्या. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? सुषमा अंधारे म्हणाल्या त्याप्रमाणे केतकी, कंगना आणि अमृता फडणवीस यांच्या कपड्यांबद्दल तुम्ही काही बोलणार नाहीत. प्रत्येक वेळी छत्रपतींच्या महाराष्ट्रात असं होऊ देणार नाही असा डायलॉग तुम्ही परत परत मारत होतात, आता कोणता डायलॉग मारणार असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला.
भाजप महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांचा सवाल:सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फीच्या विकृतीवर महिला आयोग गप्प का?
सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे परिधान करून अंगप्रदर्शन करणारी माॅडेल उर्फी जावेद हिच्या वर्तनावर राज्य महिला आयोगाने स्वाधिकाराने (सुमोटो) दखल का घेतली नाही, असा सवाल भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी (ता.५) केला. राज्य महिला आयोग दुटप्पी असून आयोगाने दखल घेतली नसली तरी भाजप उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा वाघ यांनी दिला. वाचा सविस्तर
महाराष्ट्रात नंगा नाच चालू देणार नाही:चित्रा वाघ यांचा इशारा अन् सवालही, उर्फी जावेदसारखा महिला आयोगही बेफाम झालाय का?
महिला आयोगाने महिलांचा सन्मान जपायला हवा परंतु महिला आयोग सुमोटोही दाखल केली नाही. महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिला दिला. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.