आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Antibodies Cocktail Injection Boron For Corona Patients; Successful Treatment Of 55 Patients At Akluj; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:अँटिबॉडीज कॉकटेल इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी वरदान; अकलूज येथे 55 रुग्णांवर यशस्वी उपचार

अकलूज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टरांच्या दाव्याला फिजिशियन असोसिएशन ऑफ इंडियाकडूनही दुजोरा

अकलूज येथील डॉक्टरांनी ५५ कोरोनाबाधित रुग्णांवर अँटिबॉडीज कॉकटेल (मोनोक्लोनल) या इंजेक्शनचा वापर केला. त्यापैकी केवळ ४ रुग्णांना ऑक्सिजन देण्याची गरज भासली. बाकी ५१ रुग्ण केवळ तीन दिवसांत पूर्णपणे बरे झाले. अकलूज येथील क्रिटिकल केअर अँड ट्राॅमा सेंटरमध्ये या उपचार पद्धतीचा अवलंब झाला.

येथील डॉ. धनेश गांधी, डॉ. समीर बंडगर, डॉ. अतुल फडे आणि डॉ. निनाद फडे या डॉक्टरांच्या पथकाने या उपचार पद्धतीचा प्रभावीपणे वापर केला आहे. असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. अनिकेत जोशी यांनी ही उपचार पद्धती लोकप्रिय होत असल्याचे म्हटले आहे. कोरोना लसीचा डोस घेतलेल्या व न घेतलेल्या रुग्णांसाठी ही पद्धती अतिशय प्रभावी आहे.

६० हजार रुपयांपर्यंत किंमत, ऑक्सिजन देण्याची गरज नाही

  • १२ वर्षांवरील ४० किलोवर वजन असलेल्या व्यक्तींसाठी उपचार पद्धती योग्य आहे. यासाठी दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनची किंमत ६० हजार रुपयांपर्यंत असली तरी रुग्ण केवळ दोन ते तीन दिवसांत बरा होतो. त्याला ऑक्सिजनची शक्यतो गरज लागत नाही.
  • हे अँटिबॉडीज कॉकटेलचे इंजेक्शन घेतल्यानंतर पाच ते सहाव्या दिवशी बाधित रुग्णांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह येतो, असा डॉक्टरांचा दावा.
  • पहिला डोस घेतलेल्या रुग्णांवरही हे उपचार होऊ शकतात. दोन्ही डोस घेतल्यांच्या शरीरातील अँटिबॉडीजची पातळी तपासली जाते. ती योग्य असेल तर हे इंजेक्शन घेण्याची गरज नाही.

पहिल्या ७ दिवसांतच रुग्णांना सुटी
डॉ. धनेश गांधी म्हणाले, कोरोना झाल्यानंतर पहिल्या ७ दिवसांत हे इंजेक्शन दिल्यानंतर रुग्ण बरे होतात, असा अनुभव आहे. तत्काळ इंजेक्शन घेतले तर आणखी चांगले परिणाम दिसतात. इंजेक्शनची किंमत जास्त असली तरी यानंतर रेमडेसिविर बहुतेक वेळा घ्यावे लागत नाही. अॅडमिट व इतर खर्चाच्या तुलनेत इंजेक्शनचा खर्च खूप कमी आहे.

माझी आई कमल शंकेश्वर (८२) यांना कोरोना झाल्यानंतर मी तत्काळ अँटिबॉडीज कॉकटेल इंजेक्शन त्यांना दिले. त्याच दिवशी त्यांना दवाखान्यातून घरी आणले. त्या लागलीच पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. - राजेंद्र शंकेश्वरा, अकलूज.

बातम्या आणखी आहेत...