आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंना 10 दिवसांची कोठडी, NIAने केली होती चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंबानींच्या घराबाहेरील इनोव्हा वाझेंची ?

मुंबईतील अँटीलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयए(NIA)च्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. एनआयच्या वकिलांनी वाझेंची 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. दरम्यान, शनिवारी 13 तासांच्या चौकशीनंतर एनआयएने सचिन वाझेंना अटक केली होती.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या गाडी प्रकरणी शनिवारी 13 तास सचिन वाझेंची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा अटक करण्यात आली. आज सकाळी सचिन वाझेंना कोर्टात हजर करण्यात आले होते. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंबानींच्या घराबाहेरील इनोव्हा वाझेंची ?

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणे(NIA)च्या हाती मोठे यश आले आहे. एनआयएच्या पथकाने अँटीलियाबाहेर दिसलेल्या इनोव्हा गाडीला शनिवारी रात्री शोधले आहे. वृत्त संस्थेने तपास यंत्रणेच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, क्राइम ब्रांचमध्ये असताना सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी हीच कार वापरत होते.

सचिन वाझेंचा अजून एक व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, सचिन वाझे यांचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका स्कॉर्पियो कारजवळ दिसत आहेत. ही कार हूबेहूब अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार सारखी आहे. महाराष्ट्र ATS आता या व्हायरल व्हिडिओचा तपास करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरचा आहे, जेव्हा वाझे हे पोलिस पथकासह पत्रकार अर्णब गोस्वामीला अटक करत होते. यावेळी, रिपब्लिक टीव्हीच्या टीमने त्यांचा पाठलाग केला, त्यानंतर त्यांनी ताफा थांबवला. त्यावेळी तीच संशयास्पद कार त्याच्या जवळ उभी असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...