आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने रविवारी ड्रग्स फॅक्टरी चालवणाऱ्या आरिफ भुजवालाला रायगडमधून अटक केले आहे. अटक केलेला भुजपाला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमचा खास माणुस होता. NCB अनेक दिवसांपासून भुजवालाच्या माघावर होते. भुजवालाच्या अटकेनंतर दुबईतील मोठ्या ड्रग सिंडिकेटचा खुलासा होऊ शकतो.
खिडकीतून उडी मारुन पळून गेला भुजवाला
मागच्या आठवड्यात NCB ने करीम लालाचा नातलग चिंकू पठानच्या अटकेनंतर दाऊद इब्राहिमच्या ड्रग्स नेटवर्कचा भांडाफोड करण्यासाठी भुजवालाच्या घरावर छापेमारी केली होती. भुजवाला मुंबईतील डोंगरीमध्ये आपल्या घरातून ड्रग्स फॅक्टरी चालवत होता. परंतू, जेव्हा NCB भुजवालाच्या घरी दाखल झाली, तेव्हा भुजवाला खिडकीतून उडी मारुन पळून गेला होता.
चिंकूकडून जप्त केला हत्यारांचा मोठा साठा
चिंकू पठानकडे NCB ला हत्यारांचा मोठा साठा आणि कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ आढळून आले. चिंकून करीम लालाचा नातलग आहे. करीम 1960 ते 1980 पर्यंत सक्रीय होता. NCB च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चिंकूविरोधात यापूर्वीही NDPS अंतर्गत काही गुन्हे दाखल आहेत.
चार ठिकाणी केली छापेमारी
चिंकूच्या चार ड्रग्स फॅक्टरींवर मागच्या आठवड्यात बुधवारी छापेमारी करण्या आली होती. येथूनच NCB ने कोट्यावधी रुपये, ड्रग्स आणि मोठ्या प्रमाणात हत्यारांचा साठा जप्त केला. बॉलिवूड अॅक्टर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर NCB ने मुंबईत ड्रग्स विरोधात अनेक कारवाया केल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.