आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन:अर्जुन रामपालची NCB कडून 7 तास चौकशी, घरातून जप्त केलेली औषधे आणि पॉल बर्टेलबाबत चौकशी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ड्रग्स प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपालची नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने शुक्रवारी 7तास चौकशी केली. अर्जुन रामपाल सकाळी 11.10 वाजता NCB च्या ऑफिसमध्ये गेला होता, तो संध्याकाळी 6.30 वाजता बाहेर आला. चौकशीनंतर एनसीबी ऑफीसमधून बाहेर आलेला अर्जुन रामपाल माध्यमांना प्रतिक्रिताय दिली तो म्हणाला की, 'माझ्या घरात सापडलेली औषधे डॉक्टरांनी दिलेली आहेत. या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. एनसीबीने फोन केला होता, म्हणून मी येथे आलो होतो. एनसीबीला तापासात पूर्ण सहकार्य करणार आहे. यापूर्वी NCB ने रामपालचा मित्र पॉल बर्टेलला ताब्यात घेतले. यानंतर एनडीपीएस कोर्टाने बर्टेलला 25 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

तपास संस्थांनी गुरुवारी रात्री पॉलला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. 10 तास चौकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. पॉल मूळ ऑस्ट्रेलियातील असून, तो एक आर्किटेक्ट आहे. तो अर्जुन रामपालसोबत अनेक पार्टीजमध्ये सामील होता. रामपाल आणि पॉलला आता समोरा-समोर बसवून चौकशी केली जाईल.

यापूर्वी NCB ने सोमवारी अर्जुन रामपालच्या घरी रेड मारली होती. यानंतर बुधवारी आणि गुरुवारी रामपालची गर्लफ्रेंड गेब्रिएला डेमेट्रियड्सचीही चौकशी करण्यात आली. ग्रेबिएलाची आतापर्यंत 12 तास चौकशी करण्यात आली आहे. तपास संस्थांनी सोमवारी रामपालच्या ड्रायवरलाही ताब्यात घेऊन चौकशी केली होती. NCB च्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, रामपालच्या घरातून काही बंदी घातलेली औषधे सापडली होती. याशिवाय घरातून मोबाइल फोन आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...