आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्णब VS महाराष्ट्र पोलिस:अर्णबचा आरोप- मुंबई पोलिसांनी मारहाण केली, व्हिडोओतून समोर आले 13 मिनीटांच्या हाय व्होल्टेज ड्राम्या मागचेचे सत्य

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका इंटीरिअर डिझायनरच्या कथित आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अर्णबला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक सकाळी 6.30 वाजता गोस्वामीच्या घरी दाखल झाले होते. पण, अर्णब यांनी दिड तासानंतर त्यांच्या घराचे दार उघडले.

दरम्यान, अर्णबने पोलिसांवर फिजिकल असॉल्ट आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप लावला आहे. परंतू, महाराष्ट्र पोलिसांनी या आरोपांना फेटाळून लावले आहे. यादरम्यान आमच्या हाती अर्णबच्या घरी 13 मिनीट चाललेल्या हाय व्होल्टेज ड्राम्याचा व्हिडिओ लागला आहे. याद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अर्णबच्या घरी 13 मिनीटे नेमके काय घडले.

अर्णबचा आरोप...

अर्णबच्या घरात झालेल्या ड्रम्यामागचे सत्य

व्हिडिओच्या सुरुवातील अर्णब गोस्वामीची पत्नी घराचे दार उघडताना दिसते. जवळ-जवळ दोन डझन पोलिस अर्णब यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते, यात काही महिला पोलिसदेखील सामील होते. घराचे दार उघडताच एक पोलिस अधिकारी अर्णबचा हात पकडून बाहेर खेचण्याचा प्रयत्न करतो. यानंतर अर्णब आपला हात सोडून परत घरात जातात आणि सोफ्यावर बसतात, यादरम्यान एक अधिकारी परत अर्णब यांना उचलून खेचण्याचा प्रयत्न करतो. या संपूर्ण प्रकारादरम्यान अर्णब यांची पत्नी मोबाईलमधून व्हिडिओ बनवताना दिसत आहे, तर महिला पोलिस त्यांना व्हिडिओ काढण्यापासून थांबवत आहेत.

व्हिडिओत पुढे दिसत आहे की, अर्णब सोफ्यावर बसलेले दिसत आहेत आणि पोलिसांसोबत जाण्यास नकार देत आहेत. यादरम्यान अर्णब विचारत आहेत की, तुम्ही मला कोणत्या प्रकरणात अटक करत आहात, यावर पोलिस सांगतात की, अलीबाग पोलिस स्टेशनमधील दाखल प्रकरणात तुम्हाला अटक करत आहेत. यानंतर अर्णब पोलिसांना वॉरंटची मागणी करतात. व्हिडिओत मध्ये-मध्ये अर्णब आणि त्यांची पत्नी मारहाण झाल्याचे सांगत आहेत. यानंतर दोन पोलिस कर्मचारी अर्णबला खेचण्याचा प्रयत्न करतात, पण अर्णब परत हात सोडवून सोफ्यावर बसतात. जवळ-जवळ सात मिनीटे समजून सांगितल्यानंतरही अर्णब पोलिसांसोबत जाण्यास नकार देतात. त्यानंतर तीन ते चार पोलिस अर्णबला पकडून खेचत बाहेर नेतात.

मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

पोलिस म्हणाले की, आम्ही अर्णब यांना सांगितले की, तुमच्याकडे कायदेशीर पर्याय आहे. पण, आता तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल. तसेच, पुढे कोणी आरोप लावू नये यासाठी आम्ही एका पोलिस कर्मचाऱ्याला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवण्यास सांगितले होते. पोलिसांनी सांगितल्यानुसार, अर्णब यांच्यावर कलम भा.दं.वि. कलम 306 अंतर्गत अटक केल्यामुळे वॉरंटची गरज नाही.