आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळात गणेशोत्सव:लालबागच्या राज्याच्या दरबारात सुरू आहे 'आरोग्य उत्सव'; सीएम उद्धव ठाकरेंपासून नितिन गडकरीपर्यंत, अनेकांच्या घरात विराजमान झाले बाप्पा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकारी निवास्थानावर सहकुटुंब गणपतीची स्थापना केली
  • लालबागच्या राजाच्या दरबारात यावर्षी प्लाज्मा आणि ब्लड डोनेशन कॅपचे आयोजन

कोरोना काळात आजपासून महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. मुंबई-पुणेसह राज्यातील अनेक ठिकाणी सोशल डिस्टेंसिंगसह सरकारने घालुन दिलेल्या नियमांसह उत्सव साजरा केला जात आहे. यातच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकारी निवास्थान असलेल्या 'वर्षा'वर पत्नी रश्मी ठाकरे आणि मुले आदित्य, तेजससह गणपतीची स्थापना केली. यादरम्यान पुजारींशिवाय काही निवडक पाहुणे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांशिवाय केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी आपल्या नागपूरमधील निवास्थानात बाप्पाची स्थापना केली.

नितीन गडकरी यांच्या घरी बाप्पाचे आगमन
नितीन गडकरी यांच्या घरी बाप्पाचे आगमन

लालाबागच्या राजाच्या दरबारात 'आरोग्य उत्सव'

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दरबारात यावर्षी ब्लड आणि प्लाज्मा डोनेशन कँप लावण्यात आला आहे. कोरोना संक्रमणामुळे लालबागच्या राजा मंडळाने 'आरोग्य उत्सव' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी निर्देशांनुसार दरवर्षीप्रमाणे बाप्पाची विशाल मुर्तीऐवजी लहान चार फुटांची मुर्ती बसवण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत यांनी केली गणपतीची पुजा
खासदार संजय राऊत यांनी केली गणपतीची पुजा

पुण्यात अष्टविनायक गणपतीची स्थापना

पुण्यातील अष्टविनायक गणपतींपैकी रांजनगावच्या महागणपतीची मंदिर परिसरात स्थापना झाली. स्थापनेपूर्वी बाप्पाचे पूजन मंदिरातील पुजाऱ्यांनी केली. कोरोनामुळे भाविकांना मंदिरात येण्यास परवानगी नाही. याशिवाय तांबडी जोगेश्वरी गणपतीचीही स्थापना करण्यात आली.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पा विराजमान
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पा विराजमान

अनेक मराठी कलाकारांच्या घरी आले बाप्पा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पाचे आगमन. सोनालीने इको फ्रेंडली बाप्पाची प्रतिमा स्थापन केली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस