आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Artists And Crew Members Above 65 Years Of Age Are Allowed To Shoot Cultural Affairs Minister Amit Vilasrao Deshmukh

चित्रीकरणास परवानगी:65 वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

कोविड-19 पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटिटि यांच्या चित्रिकरणाची कामे, नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु करण्याकरीता; मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय दिनांक 30 मे 2020 व दिनांक 23 जून 2020 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. या सूचनांमध्ये, 65 वर्षावरील कोणत्याही कलाकार / क्रू सदस्यांना चित्रीकरण स्थळावर परवानगी दिली जाणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती.

तथापि, मा. उच्च न्यायालाने सदरील अट रद्द करण्याचा निर्णय दिल्याने, आता ६५ वर्षांवरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणात सहभागी होण्याची मुभा राहील अशी माहितीही देशमुख यांनी दिली आहे. या निर्णयामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटिटि उद्योग या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा, सांस्कृतिक कार्य विभागाचे अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे

बातम्या आणखी आहेत...