आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालेखक, महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी कोल्हापूरमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज कोल्हापूरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती अरुण गांधी यांचे पुत्र तुषार गांधी यांनी दिली. अरुण गांधी हे माजी केंद्रीय मंत्रीही होते.
अरुण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू, तर मणिलाल गांधी यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला. ते आयुष्यभर गांधी विचारावर चालले. त्यांना लहानपणी महात्मा गांधी यांचा सहवास लाभला. त्यांनी त्यांच्यासोबत सेवाग्राम आश्रमात १९४६ सुमारास काही काळ घालवला.
अरुण गांधी यांनी 'द गिफ्ट ऑफ एंगर : अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी'सह अनेक पुस्तक लिहिली. मात्र, १९८७ मध्ये ते कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. अमेरिकेत त्यांनी एका संस्थेची स्थापना केली. ती गांधी विचाराचा प्रचार आणि प्रसार करते. अरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये अवनी संस्थेच्या अध्यध्य अनुराधा भोसले यांच्या घरी हणबरवाडी येथे वास्तव्यास होते. येथेच त्यांचे निधन झाल्याचे समजते.
अरुण गांधी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, महात्मा गांधीजींचे नातू, सामाजिक कार्यकर्ते व लेखक अरुण गांधी यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आपल्या आजोबांच्या, म्हणजेच महात्मा गांधीजींच्या विचारांनुसार वाटचाल करत त्यांचा अहिंसेचा विचार जगभर पोहचविण्याचे व इतर सामाजिक विषयांवर त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यांचे सुपुत्र तुषारजी गांधी व सर्व गांधी कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो तसेच मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.