आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यन प्रकरणात आज होणार न्यायालयात सुनावणी:आर्यन खान गेल्या 17 दिवसांपासून जेलमध्ये बंद, आज आर्यनला जेल होणार की बेल? याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान क्रुझ ड्रग प्रकरणात अटकेत आहे. क्रुझवर ड्रग्स पार्टी केल्याप्रकरणी एनसीबीने छापा टाकत 02 ऑक्टोंबरला आर्यनसह अन्य जणांना अटक केली आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीत आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्स आढलेले नाही. मात्र तरी देखील गेल्या 17 दिवसांपासून आर्यन जेलमध्ये आहे.

आज आर्यनच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज न्यायालय आर्यन जेल देते की बेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. क्रुझ पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालय आज सुनावणी होणार आहे.

आज होणार सुनावणी
ड्रग्स पार्टी प्रकरणात गेल्या 02 ऑक्टोंबरपासून आर्यन जेलमध्ये बंद आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीत त्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्स आढळेले नाही. मात्र तरी देखील गेल्या 17 दिवसांपासून त्याला जेलमध्ये बंद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती हिच्या घरी ड्रग्स आढळले होते. त्याच भारती आणि तिचा नवरा हर्ष या दोघांना एनसीबीने अटक केली होती.

मात्र ड्रग्स घेतल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना दोनच दिवसात जामीन मिळाला होता. आर्यनने देखील कबुली दिल्यानंतर तसेच, बाहेर जाऊन मी एक चांगला व्यक्ती बनेल. असे म्हटले आहे. आज त्याच्या प्रकरणावर सुनावणी होणार असून, न्यायालय काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...