आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्स प्रकरणावरून एनसीपीचे भाजपवर टीकास्त्र:'शाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर ड्रग्स नाही, पिठी साखर सापडली म्हणून सोडून देतील', आर्यन केसवरून भुजबळांचे भाजपवर टीकास्त्र

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किंग खान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने क्रूझवरील ड्रग्स प्रकरणावरू अटक केली आहे. त्यावर आता राज्यातील महाविकास आघाडीतील राजकीय मंडळी भाष्य करत आहे. 'शाहरूख खानने जर भाजप प्रवेश केला तर ड्रग्सची तुलना पिठी साखर सोबत करून सोडून देतील.' असे राज्याचे अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

'गुजरातमध्ये 3000 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले. मात्र त्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आली नाही. एनसीबी शाहरूख खानला मुद्दामून त्रास देण्यासाठी हे प्रयत्न करत आहे. मात्र शाहरूख खानने जर भाजपाचा झेंडा हातात घेतला तर त्याला एनसीबी सोडून देईल.' असे म्हणत भुजबळांनी भाजप आणि एनसीबीवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एनसीबीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

ड्रग्स प्रकरणावर एनसीपीची प्रतिक्रिया..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपुर्वीच एनसीबीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मलिक म्हणाले होते की, 'शाहरूख खानला फसवण्यासाठी हा एनसीबीने केलेले षडयंत्र आहे, ही चौकशी बोगस असून, मुद्दामून आर्यनला फसवण्याचे प्रयत्न एनसीबी करत आहे. क्रूझ एनसीबीने 1300 जणांना धरले होते, त्यातील फक्त 11 जणांनाचाच एनसीबीने ताब्यात घेतले. बाकीचे सर्वांना जाऊ दिले.' असे म्हणत मलिकांनी एनसीबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.

समीर वानखेडेला धमकी
एनसीबीचे जोनल हेड समीर वानखेडे यांच्यावर टीका करत मलिक म्हणाले की, 'समीर वानखेडे हा केंद्र सरकारचा पित्तू आहे. तो अनेक जणांना फसवण्याचे काम करतो. मात्र यापुढे आता असे होणार नाही कारण, समीर वानखेडेचे पितळ लवकरच उघडे पडणार आहे. आणि त्याची नोकरी देखील जाणार हे निश्चित आहे. जनता वानखेडेला जेलमध्ये टाकेल. आमच्याकडे तसे पुरावे देखील आहेत.' असे म्हणत मलिकांनी समीरक वानखेडेला धमकी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...