आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aryan Khan Case । Even After Carrying Drugs, Bharti And Harsh Got Bail In Just Two Days, What Exactly Did Aryan's Lawyer Do Wrong

आर्यनला अद्याप जामीनची प्रतिक्षा:ड्रग्स बाळगल्यानंतरही भारती आणि हर्ष यांना मिळाला होता दोनच दिवसात जामीन, आर्यनच्या वकिलाचे नेमके काय चुकले; वाचा सविस्तर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंग खान शाहरूख याचा मुलगा आर्यन खान रेव पार्टी प्रकरणामुळे संपुर्ण जगात चर्चेत आला आहे. आर्यनला अमली पदार्थावरून एनसीबीने त्याला 2 ऑक्टोंबरपासून त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला 8 ऑक्टोंबरला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ आढळलेले नाही. पण तरीही किंग खानच्या मुलाला जेलमध्ये बाहेर येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह यांच्या घरी सापडलेल्या ड्रग्स प्रकरणामध्ये त्यांना दोनच दिवसात जामीन मिळाला होता. त्यावर हर्ष आणि भारती यांचे वकिलाने कशा प्रकारे या दोघांना जामीन मिळाला होता याचा किस्सा सांगितला आहे.

21 नोव्हेंबर 2020 मध्ये भारती सिंह यांच्या अंधेरी येथील घरातून 86.50 ग्रॅंम अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तेव्हा हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह या दोघांची बाजू वकिल आयाज खान यांनी न्यायालयात मांडली. नुकतेच त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला आपली मुलाखत दिली आहे. तेव्हा ते म्हणाले की, भारती आणि हर्ष या दोघांनाही रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा मी त्यांना लगेचच पोलीस कोठडीची मागणी केली होती. तेव्हा या दोघांना एनसीबी त्यांच्या कोठडीत घेण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी त्यांनी हर्षला एनसीबी कोठडीत घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कारण एनसीबीला असे वाटत होते की, हर्षकडून ड्रग्स प्रकरणाची अधिक माहिती मिळू शकेल. त्यामुळे मी पहिल्याच दिवशी पोलीस कोठडीची मागणी केली होती. जेणेकरून ते एनसीबीच्या कोठडीची जाऊ नये.

आयाज यांनी सांगितले की, जर हर्ष आणि भारती एनसीबीच्या कोठडीत गेले असते तर एनसीबीने वेगळ्या प्रकारे चौकशी केली असती. आणि वेगवेगळे पुरावे देखील समारे आणले असते. कारण कधी कधी केस विरुद्ध दिशेला देखील जाण्याची शक्यता असते. कारण भारती यांच्या घरी 21 नोव्हेंबर 2021 रोजी एनसीबीने छापा मारला होता. त्यात त्यांच्या घरातून 86.50 ग्रॅंम गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर भारती आणि तिचा पती हर्ष या दोघांना एनसीबीने आपल्या ताब्यात घेतले होते. तेव्हा चौकशीत त्यांनी गांजाचे सेवन करण्यास कबुली दिली होती. त्यामुळे अवघ्या दोनच दिवसात त्यांना जामीन मिळाला होता.

ड्रग्स सापडले नसतांनाही आर्यनला जामीन का मिळेना

एनसीबीने केलेल्या चौकशीत आर्यनकडे कोणत्याही प्रकारे ड्रग्स आढळलेले नाही. मात्र त्याचा मित्र अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमीचा यांच्याकडून चरस आणि ड्रग्स कॅप्सुल जप्त करण्यात आली आहे. त्या ड्रग्स कॅप्सुलचे प्रमाण 2020 मध्ये हर्ष आणि भारती यांच्या घरी सापडलेल्या ड्रग्स पेक्षा कमी होते.

बातम्या आणखी आहेत...