आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ashadhi Palakhi Utsav;Saint Dnyaneshwar Maharaj And Saint Tukaram Maharaj's Charan Paduka Visit Vithuraya On Thursday

पंढरपूर:संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पादूकांची गुरुवारी विठुरायाची भेट

पंढरपूर2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच व्दादशीच्या दिवशी पालखी सोहळ्यांनी पंढरीचा निरोप घेतला

दरवर्षी आषाढी यात्रेच्या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून येथे आलेल्या मानाच्या संताच्या पालख्या पौर्णिमेच्या दिवशी पंढरीतून आपल्या गावी जाण्यासाठी प्रस्थान करतात. मात्र यंदा  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच व्दादशीच्या दिवशी पालखी सोहळ्यांनी पंढरीचा निरोप घेतला.

या वर्षी कोरोनामुळे वारकऱ्यांविना आषाढीचा सोहळा संपन्न झाला. केवळ परंपरा टिकावी म्हणून यात्रेचे सोपस्कर पार पाडले. राज्य शासनाकडून पायी पालखी सोहळे रद्द करण्यात आले होते. केवळ नऊ मानाच्या संताच्या पालख्यांना सोहळ्यासाठी पंढरीकडे जाण्याची परवानगी दिली होती. दशमी दिवशी एसटी बसने हे पालखी सोहळे रात्री उशिरा पंढरीत दाखल झाले. 

कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशी देखील अत्यंत साधेपणाने साजरी झाली. संतांच्या पालख्यां विसावलेल्या मठातून एकादशी दिवशी या पादुकांना चंद्रभागेमध्ये स्नान घालण्यात आलं. यानंतर नगरप्रदक्षिणा झाली. रात्री हरिजागर झाला. त्या नंतर गुरुवारी (ता.२) व्दादशी दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका बरोबरच मानाच्या विविध संतांच्या पादुका विठूरायाच्या भेटीसाठी मंदिरात आल्या.  

संत ज्ञानेश्वर महाराज आणि विठुरायाची भेट झाली. त्या नंतर विठुरायाच्या भेटीसाठी एक, एक संतांच्या पादूका गाभाऱ्यात दाखल होत होत्या. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर तसेच सर्व सदस्य आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदींच्या हस्ते प्रत्येक पालखीच्या मानकऱ्यांचा सत्कार केले जात होते. सत्कारा नंतर पालख्या आपल्या मठात पालखी सोहळे परतले. व्दादशी (जेवणानंतर) सोडून पालखी सोहळे परतीच्या प्रवासासाठी सज्ज होत होते. 

प्रस्थानाची तयारी पुर्ण झाल्या नंतर आपआपल्या मठातून विविध रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या एस,टी,गाडीतून संतांच्या पादूका ठेवण्यात आल्या. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठलच्या जय घोषात पालखी सोहळ्यांनी पंढरीनगरीतून आपआपल्या गावाकडे जाण्यासाठी प्रस्थान केले. पंढरपुरातील नागरिकांसाठी हा भाऊक  असा क्षण होता.कारण शहरात संचारबंदी लागू असल्यामुळे यावर्षी संतांना घरातूनच निरोप देण्याची वेळ शहरवासीयांवर आलेली होती. दरवर्षी पौर्णिमेला गोपाळपूर येथील गोपाळकाल्या नंतर पंढरपूर सोडणाऱ्या संतमंडळींना या वर्षी व्दादशीलाच पंढरपुरातून प्रस्थान करावं लागलं. रायगडावरुन शिवछत्रपतींच्या पादूका खास विठ्ठल भेटी आणण्यात आल्या होत्या. या वेळी पादूका भेटीसाठी कशा आणल्या या बाबत शिवछत्रपतींच्या पादूका आणलेल्या मावळ्यांनी सांगितले की महाराजांच्या कृपाआर्शिवार्दाने आणि त्यांच्याकडून मिळालेल्या स्फुर्तीमुळेच आम्ही त्रिसस्तरीय पोलिस बंदोबस्त भेदून आज पंढरीनगरीत प्रवेश केला. गेल्या सहा वर्षापासून महाराजांच्या पादूका रायगडावरुन येथे आणल्या जात आहेत. छत्रपती आणि विठुरायांची भेट घडल्यामुळे समाधान पावल्याच्या भावना पादूका आणलेल्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त झाल्या.

छायाचित्रे- उमेश टोमके आणि सतिश चव्हाण,पंढरपूर. 

बातम्या आणखी आहेत...