आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ashish Shelar Comment Shivsena Over Hindutva; 'Shiv Sena Should Go To Nagpur And Take Hindutva Class' Ashish Shelar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:'शिवसेनेनं नागपूरमध्ये जाऊन हिंदुत्वाचा क्लास लावावा'- आशिष शेलार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शरजील उस्मानीला पळवण्यात कोणत्या मंत्र्याचा हात होता ? '

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेत पुन्हा जुंपली आहे. भाजपने म्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी शिवसेनेने टीका केली होती. त्याला आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'शिवसेनेनं नागपूरमध्ये जाऊन हिंदुत्वाचा क्लास लावावा', असा टोला शेलारांनी लगावला.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शेलार म्हणाले की, 'शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. अमिबालाह लाज वाटेल, अशी शिवसेना दिशाहीन आहे. त्यांना नागपूरात जाऊन हिंदुत्वाचा खरा क्लास लावाण्याची गरज आहे. नागपूरच्या कार्यालयात तुम्ही नेहमी जात असता. आताही जा आणि हिंदुत्व समजून घ्या,' असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

शरजीलला उस्मानीवरुन सरकारवर हल्लाबोल

यावेळी शेलार यांनी एल्गार परिषदेशी संबंदित शरजील उस्मानीवरुन सरकारवर हल्लाबोल केला. शेलार म्हणाले की, 'शरजील उस्मानीला पळवून लावण्यात आले आहे. त्याला पळवून लावण्यात सरकारमधील कोणत्या मंत्र्याने मदत केली ? एल्गार परिषदेची पार्श्वभूमी माहीत असतानाही एल्गार परिषदेला परवानगी का देण्यात आली?' असा सवाल शेलार यांनी विचारला.

बातम्या आणखी आहेत...