आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Assembly News And Updates; Uddhav Thackeray Had Said That Police Are Worthy Of Washing Dishes' Devendra Fadnavis

हल्लाबोल:'उद्धव ठाकरेंनी कल्याणच्या सभेत पोलिस भांडे धुण्याच्या लायकीचे आहेत, असे वक्तव्य केले होते'- देवेंद्र फडणवीस

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कंगना रानोटने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे काही दिवसांपासून नवा वाद पेटला आहे. यावर राजकीय क्षेत्रात मोठे पडसाद उठले आहेत. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे, यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. कंगनाच्या वक्तव्यामुळे मुंबई पोलिसांचा अपमान झाला म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाना साधला.

पावसाळी अधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर चहुबाजूने हल्लाबोल केला आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती, सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि कंगनाच्या प्रकरणावरही फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी फडणवीस म्हणाले की, 'कंगनाने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मुंबई पोलिसांचा अपमान झाला. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कल्याणच्या सभेत पोलिस हे भांडे धुण्याच्या लायकीचे आहेत, पोलिसांनी भांडे धुवावे, असे वक्तव्य केले होते', अशी टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

कंगना रनोट विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव

कंगना रनोटने मुंबईची पाकप्यात काश्मीरशी तुलना केली. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण्यांमध्ये संताप निर्माण झाला. संजय राऊत आणि कंगना रनोट यांच्यात मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता कंगना विरोधात विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. काँग्रेसच्या भाई जगताप यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?, असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता.

त्यानंतर कंगनाने आणखी एक ट्विट करत, ‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’, असे प्रत्युत्तर दिले.