आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिवेशनाची सांगता:आम्ही रात्रीच्या अंधारात नाही, तर दिवसाढवळ्या काम करतो; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे लांबलेल्या विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाने करण्यात आली. या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या अनेक टोले लगावल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात. जी कामे करायची ती आम्ही दिवसा ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही', असा टोला यावेळी फडणवीसांना ठाकरे यांनी लगावला

भाषणादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मुंबईत जन्मलेली पहिली व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभली हे मी माझे भाग्य समजतो. मुंबईतील जनतेसाठी आपण अनेक गोष्टी आणणार आहे. जनसंपत्तीसह वनसंपत्तीही महत्त्वाची आहे, त्यामुळे पर्यावरणाचा-हास होता कामा नये. कामे करताना अहंकार असता कामा नये. शॉर्टकट मारल्यास रात्रीच्या अंधारात झाडे कापावी लागतात. रात्री चालणारी कामे आम्ही दिवसा करू लागलो. जे करतो ते दिवसाढळ्या करतो,' असे मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

  • ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, 'कोरोना संकटामुळे आपण आरोग्याकडे लक्ष देऊ लागलो आहोत. मुंबईसह जिथे गरज असेल तिथे सगळीकडे संसर्गजन्य आजार केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व गोष्टी सुरू करताना जनतेला करोनासोबत कसे जगायचे हे शिकवण्याची गरज आहे. कोरोना संकट शेवटचे असेल असे नाही, ते कदाचित पुढच्या संकटाची नांदी असू शकते.'
  • 'मार्चमध्ये जेव्हा या संकटाला सुरुवात झाली, तेव्हा राज्यात फक्त ३ टेस्ट लॅब होत्या. आता सगळ्या एकत्र केल्या तर ५३० च्या आसपास टेस्ट करणाऱ्या लॅब आपण राज्यात निर्माण केल्या आहेत. सुरुवातीच्या काळात ७७००च्या आसपास रुग्णशय्या होत्या, त्या आता किमान ३.५ लाखाच्या आसपास वाढविलेल्या आहेत.'
  • 'आज सुद्धा आपल्याकडे औषध नाही, लस कधी येणार याची कल्पना नाही, आशेवर आपण दिवस ढकलत चाललो आहोत. आता तरी आपल्या हातामध्ये आपला मास्क हीच आपली लस आहे. सतत हात धुत राहणे, एकमेकांपासून दूर राहणे या सगळ्या गोष्टीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्विकारल्या पाहिजेत.'
  • 'महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स आपण निर्माण केला, १५-२० दिवसांत फील्ड हॉस्पिटल निर्माण केले, नंतर जिल्ह्यांमध्ये टास्क फोर्स निर्माण केले. टास्क फोर्स सोबतच कोरोना दक्षता समिती गावागावांमध्ये निर्माण करण्यासाठी मी सूचना केल्या आहेत.'
  • '१५ सप्टेंबर नंतरच्या काळात मी महाराष्ट्रामध्ये एक कार्यक्रम राबवू इच्छितो, त्याच्यात मला आपली सगळ्यांची मदत, सहकार्य पाहिजे. याचं कारण प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी स्वीकारली तर एकूणच सगळ्या यंत्रणेवरील ताणतणाव कमी होईल, कारण यंत्रणासुद्धा अथक परिश्रम करते, अहोरात्र मेहनत करते.'
  • 'विरोधी पक्षाने शासनाला सहकार्य केले याबद्दल मी धन्यवाद देतो. मी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद देतो. हे विषाणूबरोबरचे युद्ध आहे. रुग्णसंख्येतील वाढ आपण मर्यादित ठेवली. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, हे संकट इतक्या लवकर संपणार नाही. त्यामुळे यापुढे आपल्याला गाफील राहून चालणार नाही.'
  • 'डिसेंबरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांना आपण कर्ज मुक्तीचे वचन दिले होतं, जवळपास २९.५ लाख शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त करू शकलो आहोत. तसेच येत्या वर्षभरामध्ये साधारणत: ६.५ लाख आदिवासी आणि कुपोषित बालकांना आपण मोफत दूध भुकटी देणार आहोत,' असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser