आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात नवजात बाळाच्या हत्येचा प्रयत्न:नवजात बाळाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न, शेतकऱ्याच्या तत्परतेने वाचला चिमुकल्याचा जीव

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात नवजात बाळाला जिवंत जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी नवजात बाळाला अर्धे जमिनीत पुरले होते, पण तेथे जवळच असलेल्या शेतकऱ्याने आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि बाळाचे प्राण वाचवले. यादरम्यान शेतकऱ्याने आरोपींना पकडले होते, पण पोलिस येण्यापूर्वी आरोपींना पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, घटना पुण्यातील पुरंदरजवळील अंबोडी परिसरातील आहे. प्रकाश पांडुरंग नावाच्या शेतकऱ्याने सांगितले की, दोन आरोपी एका नवजात बाळाला जमिनीत पुरण्याचा प्रयत्न करत होते. बाळाचा आवाज ऐकून मी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत आरोपींनी बाळाला अर्धे जमिनीत पुरले होते. थोडा उशीर झाला असता, तर बाळाचा जीव गेला असता.

सासवड पोलिस स्टेशनचे अधीक्षक डीएस हाके यांनी सांगितले की, आम्हाला फोन आल्यावर आम्ही एक पथक घटनास्थळी पाठवले. अद्याप बाळाची ओळख पटलेली नाही. आम्ही येण्यापूर्वी आरोपींना तेथून पळ काढला. सध्या आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत. सध्या नवजात बाळाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्याची प्रकृती ठीक आहे.