आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:औंढा नागनाथ संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 लाख रुपयांचा निधी, पाच हजार गरजूंना अन्नधान्य वाटप करणार

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
औंढा नागनाथ मंदिर - Divya Marathi
औंढा नागनाथ मंदिर
  • 17 लाख रुपये खर्चून 5 हजार गरजू व्यक्तींना धान्याच्या किटचे वाटप करणार

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ लाख रुपयांचा निधी दिला जाणार असून परिसरातील पाच हजार गरजूंना अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय शनिवारी (18 एप्रिल) संस्थान पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थानमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थानच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडूरंग माचेवाड, पदाधिकारी विद्या पवार, गणेश देशमुख, राम कदम, गजानन वाखरकर, पुरुषोत्तम देव, डॉ. खरात, आनंद निलावार, साहेबराव देशमुख यांची उपस्थिती होती.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरीकांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहे. या परिस्थितीत गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी दानशुरांनी पुढे येण्याचे आवाहन आमदार बांगर यांनी केले. यावेळी नागनाथ संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिवाय 5 हजार गरजू व्यक्तींना 17 लाख रुपये खर्चून धान्याचे किट वाटप करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले आहे. या किटमध्ये 5 किलो पीठ, 1 किलो तुरडाळ, 2 किलो साखर, 5 किलो तांदूळ, 1 किलो तेल या प्रमुख साहित्यासह भोजन बनविण्यासाठी लागणारे साहित्य तसेच साबण देखील दिली जाणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात धान्यकीट वाटपाला सुरवातही करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...