आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला केवळ 200 जणांनाच निमंत्रण; RT-PCR चाचणी, कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

जिल्हा परिषदेच्या नविन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन शुक्रवारी (दि.१७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने केवळ दोनशे मान्यवराणांच निमंत्रण देण्यात आले आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षा माना शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी बांधकाम सभापती किशोर गलांडे यांनी सांगितले की, केवळ दोनशेच पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात येणार आहे. यात ६१ जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, अशा मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निमंत्रित केलेल्या मान्यवरांनी आरटी-पीसीआर चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्र किंवा कोरोनालसीचे दोन डोस गेतल्यानांच मिळणारा प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या परिसरात आरटी-पीसीआर चाचणी व कोरोना लसीकरणाचे केंद्र उभारण्यात आली आहे.

सकाळी ९.२५ मिनिटाला होणार भूमिपूजन
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ९.२५ मिनिटाला जिल्हा परिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन करतील. याच कार्यक्रमात महापालिकेच्या रुग्णवाहिका तसेच पैठण येथील संत विद्यापीठाचे लोकार्पण ही मुख्यमंत्री करणार आहेत. या कार्यक्रमासाठी जवळपास आठ मंत्री येण्याची शक्यता आहे. दरम्यान कार्यक्रमाची सर्व तयारी झाली असून आपल्या कार्यकाळात इमारतीचे भूमिपूजन होत असल्याचे समाधान असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी व्यक्त केला.

कोण किती मिनिटे बोलणार अगोदर ठरवून घ्या- सत्तार

बुधवारी सायंकाळी अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषद नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन होणार या कार्यक्रम स्थळाची पाहणी केली यावेळी त्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या यात ते म्हणाले केवळ 50 मिनिटे मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे यासाठी येणाऱ्या प्रमाणे मंडळांची पार्किंग व्यवस्था व्यवस्थित करा तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम झाला पाहिजे दरम्यान भाषण करता वेळी जिल्हा परिषदेची कोण किती मिनिटे आईन वेळेवर जास्त भाषण लांबउ नका अशा सूचना सत्तार यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...