आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी मृत्यू:हरिश्चंद्रगडावरील डोहात बुडून औरंगाबादच्या पर्यटकाचा मृत्यू , मुकुंदवाडीतील ज्ञानेश्वर मधुकर दांडाईतवर काळाचा घाला

अकोले6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मंगळवारी औरंगाबाद येथील काही पर्यटक हरिश्चंद्र गडावर पर्यटनासाठी आले होते. त्यातील औरंगाबाद येथील ज्ञानेश्वर मधुकर दांडाईत (२१, रा. स्वराजनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद) या तरुणाचा हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर असलेल्या डोहातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

औरंगाबाद शहरातून ७ जण मंगळवारी पर्यटनासाठी अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात आले होते. ते हरिश्चंद्रगडावर चढाई करत असताना गडाच्या दुसरा माथ्यापासून थोडे पुढे चढून गेल्यावर काही पर्यटक निसर्गसौंदर्य न्याहाळताना परिसरातून फिरत होते. हरिश्चंद्रगडावर जाताना टेकडीवरील माथ्यावर डोहातील पाण्यात ज्ञानेश्वर दांडाईत उतरला, पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. सोबत आलेल्या मित्रांनी आपल्या वाहनातून त्यास उपचारार्थ राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. याबाबत राजूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक पाेलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल विजय मुंढे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...