आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. मोठ्या दिमाखात अयोध्येत हा सोहळा पार पडला. कोरोनामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण नियमांचे पालन करण्यात आले. देशभरातील सर्व लोकांनी घरुनच हा सोहळा अनुभवला. राज्यभरातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्रभू रामाला अनोखं अभिवादन केलं आहे. पंकजा मुंडे स्वतः श्री रामाचं अप्रतिम चित्रं रेखाटलं आहे. या माध्यमातून त्यांनी श्रीरामाला अभिवादन केले आहे.
हे चित्र रेखाटून श्री रामाला अभिवादन करण्यासोबतच पंकजा मुंडेंनी सहकुटुंब हा आंदोत्सव साजरा केला. त्यांनी घरातच गुढी उभारली. तसेच रामाच्या प्रतिमेची पूजा केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत अयोध्येतील भूमिपूजन सोहळा टीव्हीवरून पाहिला. पंकजा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांना मिठाई भरवत हा आनंदोत्सव साजरा केला.
पूजेसोबतच पंकजा मुंडे यांनी श्री रामाचे सुंदर चित्रही रेखाटले आहे. त्यांनी हे चित्र रेखाटतानाचा व्हिडिओही ट्विटरवर शेअर केला होता. आज त्यांनी पूर्ण झालेल्या चित्राचा फोटो ट्विटरवर शेअर करत श्री रामाला अभिवादन केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.