आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Babanrao Jagdale, A Class One Officer, Was Caught By The Anti corruption Department While Accepting A Bribe Of Rs 85,000

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाचखोर अधिकारी:क्लास वन अधिकारी बबनराव जगदाळे 85 हजारांची लाच घेताना अँन्टी करप्शन विभागाच्या जाळ्यात

नवापूर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार येथील बांधकाम ठेकेदाराकडून जिल्हा परिषद नंदूरबार अंतर्गत मौजे पिंपरी पाडा येथे रस्त्यादुरुस्तीच्या बांधकामासाठी एकूण बिल 44 लाख त्यांना मिळाले आहे. सदर 44 लाखाच्या कामाच्या मोबदल्यात नंदुरबार पंचायत समितीतील लाचखोर बबनराव जगदाळे लोकसेवक यांनी तक्रारदाराकडे 2.5 टक्के लाच मागितली व त्याप्रमाणे हिशोब करून 1 लाख 5 हजाराची लाच नक्की करून मागणी केली. पैकी 20 हजार रुपये 2 दिवसांपूर्वी घेतले.

काल नवापूर शहरातील नवरंग रेल्वे गेटजवळ 85 हजार रुपयांची मागणी केली होती.आज 85 हजार रुपये पंच व साक्षीदार यांच्या समक्ष पंचायत समिती नंदूरबार येथे आरोपी लोकसेवक यांच्या कार्यालयात लाच स्वीकारताना पकडले असून नंदुरबार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरिष जाधव, पोलिस निरीक्षक जयपाल अहिरराव, उत्तम महाजन,संजय गुमाणे, मनोहर बोरसे, दीपक चित्ते ,संदीप नावडेकर, मनोज अहिरे अमोल मराठे ज्योती पाटील यांच्या टिमने केली. 

लाॅकडाऊन दरम्यान देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लाचखोर बबनराव जगदाळे यांना नवापूर तालुक्यातील वृक्षप्रेमी म्हणून ओळखले जाते.

अँन्टी करप्शन ब्युरो,नंदूरबार विभागाचे अधिकारी यांनी नागरीकांना आवाहन केले आहे की,आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अँन्टी करप्शन ब्युरो,नंदूरबार कार्यालयात तात्काळ संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...