आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:आश्वासन पूर्ण करा, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्या; बबनराव लोणीकरांचे नवाब मलिकांवर टीकास्त्र

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या 'ईगल बियाणे' कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीवर माजी मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर आक्रमक झाले आहेत. लोणीकर यांनी परभणीचे पालकमंत्री आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पत्र लिहून दोषींना अटक करण्याची मागणी केली आहे. याशिवाय कारवाई न झाल्यास आपले आश्वासन पूर्ण न करू शकल्याचे प्रायश्चित म्हणून मंत्रिपदाचा राजीनाम द्यावा, असेही म्हटले आहे.

लोणीकर म्हणाले की, 'मलिक साहेब बोलणे सोपे आहे. शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवणे सोपे आहे. परंतु प्रत्यक्षात ‘कानून के हाथ लंबे होते है, आपने वादा किया है तो निभाना पडेगा’. तुम्हाला शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना अटक करावी लागेल. अन्यथा तुम्हाला प्रायश्चित म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. तुम्ही जर त्यांना अटक केली, तर परभणीच्या मुख्य शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करेल,' असे बबनराव लोणीकर म्हणाले.

लोणीकर पुढे म्हणाले, 'जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ईगल बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात कंपनीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. कंपनीच्या मालकाला इंदुरला जाऊन अटक करणार, असे स्वतः नवाब मलिक यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली,' असे लोणीकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...