आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील अडीच वर्षांपासून बल्लारशाह ते मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे बेहाल होते. त्यांना नागपूरला जाऊन गाडी पकडावी लागत होती. ती समस्या आता दूर झाली असून, रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे बल्लारशाह ते मुंबई ही रेल्वे गाडी ८ एप्रिलपासून बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. परंतु ही गाडी थेट मुंबईला जाणार नसून व्हाया आदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे जाणार असल्यामुळे प्रवाशांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बल्लारशाह-मुंबई रेल्वे गाडी संदर्भात येथील नेते मंडळी नवनवे अंदाज बांधत होते व वेळोवेळी घोषणा करत होते. त्यांच्या घोषणा फोल ठरल्या आहेत. ८ एप्रिलला सुरू होणारी रेल्वेगाडी थेट वर्धमार्गे न जाता ही आदिलाबाद, नांदेड, औरंगाबादमार्गे जाणार असल्यामुळे त्या मार्गावरील प्रवाशांना सोयीचे झाले आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील ३० वर्षांपासून थेट बल्लारशाह-मुंबई रेल्वे गाडीची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.
आठवड्यातून दोन दिवस धावणार
मुंबईसाठी ही रेल्वे गाडी आठवड्यातून दोन दिवसच धावणार आहे. ही गाडी मुंबईहून रविवार व मंगळवारी रात्री ९.४५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी बल्लारशाह स्थानकावर ७.५० ला पोहोचेल व इथेच थांबेल आणि बल्लारशाह स्थानकावरून परत मुंबईसाठी सोमवार व बुधवारी रात्री ९.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला पोहोचेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.