आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर सध्या ईडीची चौकशी सुरू आहे. यात आणखी एक नाव जोडले गेले आहे. काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या मेव्हण्याची चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता बाळू धानोरकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ईडीच्या नागपूर कार्यालयाच्या वतीने चंद्रपूर पोलिसांना या संदर्भातले पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांनी प्रवीण काकडे यांच्या विरोधात असलेल्या गुन्ह्यांची चौकशी केली आहे. तसेच काकडे यांच्या चौकशीसाठी पथक दाखल झाल्यास पोलिसांच्या वतीने त्यांना सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रामुळे काँग्रेसचे राज्यातील खासदार बाळू धानोरकर यांचे मेहुणे प्रवीण काकडे यांची लवकरच ईडी कडून चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत खासदार धानोरकर
सध्या काँग्रेसचे खासदार असलेले बाळू धानोरकर पूर्वी शिवसेनेत होते. मात्र 2019 मध्ये बाळू धानोरकर यांनी शिवसेनेच्या सदस्य पदासह आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते काँग्रेसकडून लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. त्याचबरोबर धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या देखील काँग्रेस कडून वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. सुरुवातीच्या काळात महाविकास आघाडीची सत्ता असताना देखील धानोरकर दांपत्य भाजपासोबत जवळीक वाढवत असल्याची चर्चा सुरू होती. तत्कालीन पालकमंत्री विजय वड्डेट्टीवार आणि खासदार ाबळू धानोरकर दांपत्या यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
महाविकास आघाडीला घरचा आहेर
चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या 165 पदांच्या नोकर भरतीत राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली होती. मात्र, ही नोकर भरती वादग्रस्त ठरली होती. या बँकेत अनेक घोटाळे झाले असून नोकर भरती न करता, या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खासदार बाळू धानारेकर यांनी लोकसभेत केली होती. तर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी तशीच मागणी विधानसभेत केली होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील धानोरकर दांम्पत्य यांनी केलेली ही मागणी त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती. यावरुन ते भाजपच्या जवळ जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.