आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेत्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. त्याचबरोबर पंकजा मुंडे , सुप्रियाताई सुळे या दारू पितात असे हभप बंडातात्या कराडकर यांनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या दंडवत दंडुका आंदोलनाच्या वेळी बोलताना म्हटले.
महाराष्ट्र शासनाने वाईन किराणा मालाच्या दुकानात विक्रीला ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन सातारा येथे करण्यात आले.
यावेळी आंदोलकांपुढे बोलताना बंडातात्या कराडकर यांनी उपरोक्त विधान केले. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यामुळे बरीच खळबळ उडालेली आहे. बंडातात्या कराडकर यांची बोलताना जीभ घसरली असे म्हटले तरी चालेल त्यांनी कुठल्या पुढाऱ्याचा मुलगा दारू पीत नाही, असे तुम्हाला माहित असेल तर मला सांगा असे पत्रकारांनाच विचारले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही बंडातात्या कराडकर यांनी टीका केली ढवळ्याशेजारी बांधला पवळा असे म्हणायलाही कमी केले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.