आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Bank Robbery । Bank Of Maharashtra । Bank Robbery In Bank Of Maharashtra In Shirur Incident Captured On CCTV Camera

शिरुरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रात दरोडा:बंदुकीचा धाक दाखवत भरदिवसा बँकेत दरोडा, 2 कोटींचे दागिन्यांसह 31 लाख रुपये लंपास; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

शिरूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरदिवसा बँक कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून 2 कोटी रुपये आणि 31 लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पिंपरखेड या गावामधील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे.

पाच दरोडेखोरांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली व लाँकरमधून 2 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह 31 ते 35 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पळ काढला आहे. दरोडा टाकल्यानंतर सिल्वर कलरच्या कारमध्ये बसून जांबुत तालुका शिरूर या दिशेने दरोडेखोर वेगात पळून गेले. ही घटना आज दुपारी 1.30 दरम्यान घडली आहे. सदरील प्रकाराने बँकेसह परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी धाव घेतली आहे. सदरील प्रकार हा सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आला असून, पोलीस त्याद्वारे तपास करण्याचा प्रयत्न करत आहे.

बातम्या आणखी आहेत...