आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Be Careful If 'police'  Written On Vehicle | Difficulties With Security Investigations | Possibility Of Accidents Through Vehicles | Penal Action Initiated

वाहनावर 'पोलिस' लिहाल तर खबरदार:सुरक्षा तपासास अडचणी; वाहनांमार्फत घातपाताची शक्यता, दंडात्मक कारवाई सुरु

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आता वाहनावर 'पोलिस' लिहीलेले असेल तर कारवाई होणार आहे. नांदेड परिक्षेत्रातील परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात याबाबत आजपासून विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे.

अनेकदा पोलिसांकडून सर्रासपणे आपल्या वाहनांवर 'पोलिस' अशाप्रकारची लाल रंगातली पाटी रंगलेली दिसून येते. लोकांवर जरब बसवण्यासाठी तसेच पदाचा लाभ घेण्यासाठी पोलिसांकडून आपल्या वाहनांवर अशाप्रकारे लिहिले जाते. मात्र आता पोलिसांना असे करता येणार नाही. याबाबत सक्तीने पाऊले उचलली जात आहेत. नांदेड जिल्ह्यातून कारवाईस सुरुवात झाली आहे.

नाकाबंदीस अडचणी

पोलिसांच्या वाहनावर अशाप्रकारे पोलिस किंवा महाराष्ट्र पोलिसांचा लोगो असल्यामुळे नाकाबंदी तसेच सुरक्षा तपासणीस अडचणी येतात. त्यामुळे अशाप्रकारच्या पोलिस पाटीचा चुकीचा वापर होऊन नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. तसेच या वाहनांमार्फत घातपाताचे कृत्य होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

पाट्यांचा गैरवापर

याबाबत नवीन केंद्रीय मोटार वाहन कायदा देखील आला आहे. या कायद्यानुसार अशाप्रकारच्या वाहनांसाठी दंडाची रक्कम तीन ते पाचपटींनी वाढवण्यात आली आहे. कारण असे आढळून आले की, पोलिसांसोबतच त्यांचे नातेवाईकही अशाप्रकारच्या पाट्यांचा गैरवापर होत आहे. यापुढे अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.

नियमित अहवाल जमा करा

परभणी, नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये आजपासून सात दिवस याबाबत मोहीम राबवण्यात येणार आहे. याबद्दलचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उप अधीक्षक सचिन सांगळे यांनी 4 जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक यांना दिले आहेत. कारवाईचा प्रकार, एकूण कारवाईची संख्या आणि त्यातून वसूल करण्यात आलेला दंड याचा नियमित अहवाल जमा करावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...