आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Bedroom In Maharashtra And Kitchen In Telangana; Boundary Line Drawn On The Wall, House Owner Says, We Have No Problem

असेही गाव:महाराष्ट्रात बेडरूम अन् तेलंगणात किचन; भिंतीवर आखली सीमारेषा, घरमालक म्हणतात; आम्हाला काहीही अडचण नाही

चंद्रपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पवार यांच्या याच घरामध्ये दोन्ही राज्यांच्या सीमा आहेत. - Divya Marathi
पवार यांच्या याच घरामध्ये दोन्ही राज्यांच्या सीमा आहेत.

राज्यात सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमाप्रश्न माेठ्या प्रमाणात पेटला आहे. सांगली जिल्ह्यातील जत आणि नांदेड जिल्ह्यातील काही गावांनी आपल्याला कर्नाटकात सहभागी होऊ द्यावे, अशी मागणी केली आहे. मात्र, आता अचानक चंद्रपूर जिल्ह्यातील महाराजगुडा हे एकदम चर्चेत आले आहे. या गावामध्ये अनोखे असे घर आहे. या घरातील बेडरूम महाराष्ट्रात तर किचन तेलंगणात आहे. सध्या या गावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.

महाराजगुडा गावातील उत्तम पवार यांचे घर दोन्ही राज्यांमध्ये विभागलेले आहे. भिंतीवर दोन्ही राज्यांची सीमा आखली असून तेलंगणा आणि महाराष्ट्र लिहिलेले आहे. घराच्या मधोमध दोन्ही राज्यांची सीमा असली तरी यापासून आम्हाला काहीही अडचण नसल्याचे उत्तम पवार यांनी स्पष्ट केले आहे. उत्तम पवार यांच्या घरात एकूण ८ खोल्या आहेत. यापैकी ४ खोल्या तेलंगणात जातात आणि उर्वरित खोल्या महाराष्ट्रात असल्याचे त्यांनी सांगितले. घरात १२ ते १३ जण असून स्वयंपाकघर तेलंगणात आहे.

दोन्ही राज्यांचा कर भरतो : पवार
सीमा निश्चित करण्यासाठी १९६९ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. या वेळी आमचे घर दोन्ही राज्यांमध्ये येते हे स्पष्ट झाले होते. आम्ही दोन्हीकडील ग्रामपंचायतींचा कर भरतो, असे उत्तम पवार यांनी सांगितले.

तेलंगणाचा १४ गावांवर दावा
या भागातील महाराजगुडा हे गाव दोन्ही राज्यांत विभागले गेले आहे. या भागातील १४ गावे महाराष्ट्रातील असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पण तेलंगण आजही या गावांवर आपला दावा असल्याचे सांगत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार याबाबत काय करते हे पहावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...