आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Bhandara Civil Hospital: The Leak Caused The Oxygen Cylinder In The Covid Center To Explode; News And Live Updates

भंडारा:गळतीमुळे कोविड केंद्रातील ऑक्सिजन सिलिंडरचा झाला स्फोट; जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना

भंडाराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल की काय अशी भीती काही रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये निर्माण झाली होती.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केंद्राला पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनच्या सेंट्रल लाइनमध्ये गळतीमुळे स्फोट झाला. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. यापूर्वी जानेवारी महिन्यात याच रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये झालेल्या अग्निकांडात ११ निष्पाप बालकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल की काय अशी भीती काही रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये निर्माण झाली होती.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड ब्लॉक आहे. सध्या रुग्णांची वाढती संख्या बघता या रुग्णालयातील पॉझिटिव्ह रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून नेत्र विभागात नव्याने कोविड युनिट सुरू करण्यात आले आहे. हे युनिट दोन दिवसांपूर्वीच सुरू झाले होते. या युनिटमधील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा यासाठी ऑक्सिजनची सेंट्रल लाइन तयार केली आहे. या सेंट्रल लाइनमध्ये अचानक गळती झाली. यामुळे तिथे स्फोट झाला. स्फोटाचा आवाज येताच कोविड केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन आग तातडीने विझविली.

दरम्यान, या केंद्रामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना तातडीने इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. कोविड केंद्रामध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले अाहे. सर्व रुग्ण सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फारुकी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...