आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Bhandara Fire Incident News And Updates 'Incident Will Be Thoroughly Investigated, Strict Action Will Be Taken Against The Culprits Chief Minister Uddhav Thackeray

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडारा आग दुर्घटना:'घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भंडारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'हात जोडून उभं राहण्याशिवाय काहीच करू शकलो नाही'

काल शनिवारी भंडारा येथील रुग्णालयात आग लागल्याने दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्यात जाऊन पीडित कुटुंबांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल. या प्रकरणात कोणतीही कसर ठेवण्यात न ठेवता दोषींवर कडक कारवाई केली जाईल. आग प्रकरणी एक टीम चौकशी करीत असून मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी.एस. रहांगदळे यांना देखील यात सहभागी करून घेण्याचे निर्देश मी दिले आहेत. या घटनेतून धडा घेऊन, राज्यातील सर्व रुग्णालयाच्या फायर अँन्ड सेफ्टी ऑडिटचे आदेश दिले आहे, जरी ऑडिट झाले असले तरी पुन्हा करायला लावू, असेही ते म्हणाले.

हात जोडून उभं राहण्याशिवाय काहीच करू शकलो नाही

माध्यमांशी बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की, 'दुर्घटनेतील पीडित कुटुंबाची मी भेट घेतली. हात जोडून उभे राहण्याशिवाय मी काहीही करु शकलो नाही. त्यांची सांत्वना करता येईल असे शब्द माझ्याकडे नव्हते.हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. पीडितांचे दुःख न भरून निघणारे आहे. आम्ही या घटनेची अत्यंत गंभीरपणे दखल घेतली असून, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा अपघात अचानक घडला की आणखी कोणती कारणे आहेत, हे तपासले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...