आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Bhandara Fire Incident News And Updates: Medical Education Minister Amit Vilasrao Deshmukh Visits Bhandara General Hospital Immediately

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडारा आग दुर्घटना:वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची तातडीने भंडारा सामान्य रुग्णालयात भेट

भंडारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आगीच्या घटनेची घेतली सविस्तर माहिती

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे आग लागून १० नवजात शिशुचां दुर्दैवी मृत्यू झाला त्या संदर्भाने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सायंकाळी तातडीने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. रुग्णालयातील यंत्रणेशी चर्चा करून घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली.

या भेटीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते तसेच डयुटीवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. घटनास्थळी तातडीने पोहचून उपाय योजना करणाऱ्या अग्निशमन दलाच्या तसेच सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचे देशमुख यांनी कौतुक केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासन मृतकांच्या पालकांच्या पाठीशी आहे. घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखाची मदत देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल प्राप्त होताच घटनेचे नेमके कारण कळणार आहे. यावेळी त्यांनी आरोग्य उपसंचालकांसोबत चर्चा करुन तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन या संदर्भाने सविस्तर चर्चा केली. यावेळी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री राज्यमंत्री विश्वजीत कदम तसेच आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी व राजा तिडके आदी मान्यवर सोबत होते.

अमित देशमुख यांनी भंडारा येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूर चंद्रपूर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता सोबत आढावा बैठक घेतली. तसेच यापुढील काळात अशी कुठे ही घटना घडू नये या दृष्टीने सर्वतोपरी उपाय योजना आखाव्यात काळजी घ्या यावी अशा सूचना यावेळी त्यांना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...