आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भिवंडी इमारत दुर्घटना:बचाव कार्य चौथ्या दिवशी पूर्ण, दुर्घटनेत 38 जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंडमधील 35 वर्षे जुनी इमारत कोसळण्याची घटना सोमवारी (21 सप्टेंबर) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातात आतापर्यंत तब्बल 38 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 25 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, आज चौथ्या दिवशी या ठिकाणचे बचाव कार्य संपले आहे.

सोमवारी घडलेल्या अपघाताचे बचावकार्य आज संपले आहे. एनडीआरएपचे बचाव कार्य बुधवारी थांबवणार होते. परंतु अडीच वर्षीय मुसैफच्या वडिलांनी मुलाला शोधण्याची विनंती केल्यानंतर पुन्हा बचावकार्य सुरू करुन आज सकाळी 10 वाजता बचाव कार्य बंद करण्यात आले. सर्व पथके आता माघारी रवाना झाले आहेत. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मोहम्मद शब्बीर कुरेशी यांच्या अडीच वर्षीय मुसैफचा तर मृतदेह देखील अद्याप सापडला नाही. दरम्यान दुर्घटनेत 22 कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. बचाव कार्य थांबवल्यानंतर येथील कुटुंबीय आणि नातेवाईक सर्वच घटनास्थळी आपल्या घरातील साहित्याची, मौल्यवान वस्तूंची शोधाशोध करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...