आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:भुजबळ म्हणाले, वक्त सबका बदलता है..., दरेकर : सरकारचा होणार करेक्ट कार्यक्रम

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देगलूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रचाराच्या निमित्ताने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी देगलूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. यात मंत्री भुजबळ यांनी “ये वक्त वक्त की बात हैं, वक्त सबका बदलता हैं, आज तेरा है, कल मेरा होगा...’ अशी शायरी करत भाजपवर हल्ला चढवला. तर राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला केला होता. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देगलूरची पोटनिवडणूक सरकारचा कार्यक्रम करण्यावर शिक्कामोर्तब करणारी असले, असे दरेकर यांनी म्हटले.

काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा प्रचार करताना मंत्री भुजबळ यांनी आपल्या भाषणात शेराेशायरीची पखरण करत खास शैलीत भाजपवर हल्ला चढवला. ईडीच्या कितीही कारवाया केल्या तरी मी बदलणार नाही, असेही ते म्हणाले. या वेळी उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्यासह िश‍वसेनेचे खासदार हेमंत पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुळकर, आमदार अमरनाथ राजूरकर, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर आदींची उपस्थिती हाेती.

पालकमंत्र्यांची दडपशाही सुरू आहे
पंढरपूरच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध आघाडी सरकार असा सामना झाला होता. मतदारांनी सरकारविरोधी कौल दिला व भाजपला विजयी केले. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. देगलूरच्या निवडणुकीतही पालकमंत्री दडपशाही करत आहेत. व्यापाऱ्यांना अधिकाऱ्यांमार्फत धमकावण्याचे काम पालकमंत्री अशोकराव चव्हाण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. या वेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, भारतीय जनात युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. विक्रांत पाटील, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, मनोज पांगरकर, दिलीप कंदकुर्ते आदींची उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...