आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:केंद्राकडून मोठी मदत; राज्याचे नेतेच कांगावेखोर, देवेंद्र फडणवीस यांचे पटोलेंना प्रत्युत्तर

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'माेदीजींना नेहमीच पत्र लिहितो'

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना मी नेहमीच पत्र लिहिताे अाणि महाराष्ट्रासाठी केलेली मागणी ते पूर्णही करतात. मात्र, महाविकास आघाडीतील काही नेते कांगावेखाेर असून अशांना मी उत्तर देत नाही, अशा शब्दांत विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाव न घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्यावर पलटवार केला. फडणवीस यांनी काँग्रेस नेत्या साेनिया गांधी यांना पत्र लिहिले हाेते. त्यावर पटाेले यांनी फडणवीस यांना माेदीजींना पत्र लिहिण्याचा सल्ला दिला हाेता.

देवेंद्र फडणवीस रविवारी अकाेल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात काेविडच्या अनुषंगाने अाढावा घेण्यासाठी अाले हाेते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. साेनिया गांधी यांना पत्र लिहून भाजपचे नेते फडणवीस हे केंद्रातील माेदी सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत अाहेत, असा अाराेप नाना पटाेले यांनी केला हाेता. त्यामुळे फडणवीस यांनी माेदींना पत्र लिहिण्याचा सल्लाही पटोले यांनी दिला हाेता. यावर फडणवीस यांनी पटाेले यांचे थेट नाव न घेता त्यांचा उल्लेख कांगावेखाेर असा केला. त्यांनी पटोलेंच्या विधानाचा समाचार घेत केंद्राने राज्याला कशी व किती मदत केली, याचा पाढाच वाचला.

माेदीजींना नेहमीच पत्र लिहिताे
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिविर इंजेक्शन्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन दिला. राज्यातील काेविडसह अन्य परिस्थितीबाबत मी नेहमीच माेदीजींना कळवताे. मात्र, आघाडीचे नेते त्याचा उपयोग करण्याऐवजी कांगावा करतात. पत्र लिहिण्याचा मला सल्ला देणाऱ्या कांगावेखाेरांना मी थेट उत्तर देत नाही, असा पलटवारही फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्यावर केला. केंद्राने पाठवलेले व्हेंटिलेटर्स राज्यात पडून हाेते. अनेक दिवस तर पॅकिंगच उघडले नाही. परिणामी काहींमध्ये दुरुस्तीचे काम निघाले. तंत्रज्ञ पाेहाेचलेल्या ठिकाणचे व्हेंटिलेटर्स सुरू झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...