आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाचा परिणाम:नारायण राणेंच्या अटकेच्या राड्यानंतर खासदार संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ, राणे-शिवसेना वादानंतर मोठा निर्णय

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे समजते आहे.

राऊत यांच्या घराबाहेर व सामना कार्यालयाबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आल्याचीही माहिती आहे. नारायण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. भाजपा-शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आले. या सगळ्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये देखील मोठ्या शाब्दिक चकमकी झाल्या.

दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून राणेंवर टीका करण्यात आली. त्यामुळे संजय राऊत आणि राणे वाद पेटण्यास सुरुवात झाली. राणेंचे दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश राणे यांनी या वादात उडी घेतली होती. 'संजय राऊत जिथं दिसतील, तिथं त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू', असा इशारा नीलेश राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. यावेळी अत्यंत टोकाच्या टीका पाहायला मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...