आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार निवडणूक:'बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही देवेंद्रजीच पाहिजे'- नितेश राणे

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. यात भाजपला मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र भाजपनेही बिहार निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशामुळे जल्लोष सुरू केला आहे. यातच, भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील ट्वीट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बिहारमध्ये भाजप 73 ठिकाणी आघाडीवर आहे. असाच निकाल लागला, तर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. पक्षाच्या कामगिरीमुळे जल्लोषाचे वातावरण आहे. आमदार नितेश राणे यांनी बिहार निवडणुकीतील विजयाचे श्रेय विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. राणे यांनी ट्वीट केले की, 'विहार देवेंद्रजींनी आणले. आता महाराष्ट्रालाही देवेंद्रजीच पाहिजे. मी पुन्हा येणार…येणारच', असे ट्विट त्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...