आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Bird Flu Outbreak In All Districts Of The State Except Sindhudurg; Maharashtra Leads In Bird Flu In The Country Due To Navapur

प्रादुर्भाव:सिंधुदुर्ग वगळता राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण; नवापूरमुळे बर्ड फ्लूमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवापुरात २८ पैकी १६ पाेल्ट्री अडचणीत

राज्यात काेराेनाचा प्रभाव कमी हाेत आहे. मात्र, बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात वाढल्याने चिंता व्यक्त होत अाहे. स्थलांतरित पक्ष्यांमुळे बर्ड फ्लूचा प्रसार सुरुवातीला उत्तरेकडील राज्यात अाढळून अाला. त्यानंतर महाराष्ट्रातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसू लागल्याने सुरक्षेचा उपाययाेजना सुरू करण्यात अाल्या. मात्र, २००६ पेक्षा यंदाच्या बर्ड फ्लूची तीव्रता अधिक असून राज्यात सिंधुदुर्ग वगळता सर्वच जिल्ह्यांत बर्ड फ्लूची लक्षणे अाढळून अाली अाहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर सध्या बर्ड फ्लूचे मुख्य केंद्र बनले आहे. बर्ड फ्लूमुळे सर्वाधिक पक्षी नष्ट करण्यात महाराष्ट्र देशात अाघाडीवर असून पाेल्ट्री व्यावसायिकांना माेठ्या नुकसानीला सामाेरे जावे लागत अाहे.

महाराष्ट्रात लेअर काेंबड्यांचे प्रमाण ८० लाख असून बाॅयलर काेंबड्या चार ते साडेचार काेटी आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, अमरावती, नंदुरबार परिसरात पाेल्ट्री व्यवसाय विस्तारलेला आहे. बर्ड फ्लूमुळे अनेकांचे रोजगार संकटात आले आहेत. राज्यात दैनंदिन सव्वा काेटी अंडी उत्पादन हाेत असले तरी महाराष्ट्रातील दैनंदिन अंड्यांचा खप सव्वादाेन ते अडीच काेटी आहे. तेलंगणा, अांध्र प्रदेश, कर्नाटकातून राेज ८० लाख ते एक काेटीपर्यंत अंडी पुरवठा होताे. बर्ड फ्लूमुळे चिकन विक्री साेबतच अंडी विक्रीवर ही यंदा १० ते १५ टक्के परिणाम झालेला अाहे. २००६ मध्ये बर्ड फ्लूचा प्रसार हा केवळ जळगाव अाणि नंदुरबार जिल्ह्यांपुरताच हाेता. त्यामुळे त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता अाले. यंदा बर्ड फ्लूचा प्रसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांत झाला अाहे.

नवापुरात २८ पैकी १६ पाेल्ट्री अडचणीत

पशुसंर्वधन विभागाचे अतिरिक्त अायुक्त डाॅ.धनंजय परकाळे यांनी सांगितले की, नवापूर मध्ये लेअर काेंबड्यंाचे पाेल्ट्री फार्म जास्त आहेत. एकूण २८ पाेल्ट्रीत नऊ लाख ७१ हजार ३४८ काेंबडया अाहेत. बर्ड फ्लूमुळे यंदा १६ पाेल्ट्रीतील चार लाख ९० हजार ४८५ काेंबड्या नष्ट करण्यात येतील. नवापूर येथील घटनेचा अाढावा घेण्यासाठी नवापुरात एक किमीत जास्त पोल्ट्री फार्म अाहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे बर्ड फ्लू पसरत आहे.

बातम्या आणखी आहेत...