आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्ड फ्लू:नांदेड, लातूरसह परभणीचे बर्ड फ्लू अहवाल आले पाॅझिटिव्ह

नांदेड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहूर तालुक्यातील पापुलवाडीत ३ कावळे, ५ कोंबड्या व कंधार तालुक्यातील नावद्याची वाडी येथे ५ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने भोपाळ येथे पाठवले हाेते. त्यांचे बर्ड फ्लू अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी १० किमीपर्यंत गावात प्रवेशबंदीचे आदेश दिले असून दाेन्ही गावातील एक किमी अंतरावरील ५०० काेंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत.

परभणी, लातूर येथे बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. नांदेड जिल्हा प्रशासनही सर्तक झाले असून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर प्रत्येकी दोन अशी एकूण ३३ पथके स्थापन केली आहेत. दाेन्ही गावातील ५०० पक्षी नष्ट करण्यात येतील, असे सहायक पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

नांदेडसह परभणी जिल्ह्यातील कुपटा (ता. सेलू), पेडगाव व लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी (ता. अहमदपूर), सुकनी (ता. उदगीर), ताेंडार (वांजरवाडी, ता. उदगीर) येथील बर्ड फ्लूचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...