आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:ज्यांनी सोनिया गांधींच्या नावाने शपथ घेतली, ते आणिबाणी विरोधात लढणाऱ्या आंदोलकांना पेन्शन कशी देणार? आशिष शेलारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांसाठी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने योजना सुरू केली होती. ही मानधन योजना सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने बंद केली आहे. ठाकरे सरकारच्या निर्णयावर भाजपकडून कठोर टीका केली जात आहे. 'ज्यांनी सोनिया गांधी यांच्या नावानं शपथ घेतली, ते आणिबाणी विरोधात लढणाऱ्या आंदोलकांना पेन्शन कशी देणार? असा सवाल भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विचारला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार म्हणाले की, ज्यांनी मा.सोनियाजी गांधी यांच्या नावाने शपथ घेतली... ते मा. इंदिराजी गांधी यांच्या आणिबाणी विरोधात लढणाऱ्या आंदोलकांना पेन्शन कशी देणार? भले यातील बहुसंख्य आंदोलक मराठी असले तरी... असे ते म्हणाले. यासोबतच देशप्रेमी आंदोलकांनी राज्य सरकारला पैशांचा प्रश्न नाही तर प्रश्न तत्त्वाचा असू शकतो असा टोलाही त्यांनी हाणला आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना ज्या प्रकारे पेन्शन दिली जाते. त्याच प्रकारे आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना फडणवीस सरकारने पेन्शन सुरू केली होती. त्यानुसार एक महिना तुरूंगवास भोगलेल्यांना दरमहा 10 हजार रूपये तर त्यापेक्षा कमी तुरूंगवास भोगलेल्यांना दरमहा 5 हजार रूपये पेन्शन दिली जात होती. ही योजना आता महाविकास आघाडी सरकारकडून बंद करण्यात आली आहे. 1975 ते 1977 या काळात तत्कालीन सरकारविरुद्ध लोकशाहीसाठी लढा देताना तुरुंगात गेलेल्यांसाठी ही योजना आखण्यात आलेली होती.

बातम्या आणखी आहेत...