आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध दरवाढीसाठी आंदोलन:दूध दरवाढीसाठी भाजपने रोखला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

कोल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दुधाला प्रति लिटर ५ रुपये तर दूध पावडरला प्रति किलो ५० रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. राज्य शासनचे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात भाजपच्यावतीने पुणे बेंगलोर महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद लाभला. दूध रस्त्यावर ओतू नये, दुग्धाभिषेक करू नये, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या आवाहनाला कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. मात्र, भाजप मित्रपक्षांनी या आवाहनाला हरताळ फासत दूध टँकर फोडले. शिवाय अनेक ठिकाणी दुग्धाभिषेक देखील घालण्यात आला.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये आणि दूध पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे ही भाजपची मागणी आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भाजपाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनाला सुरवात झाली. आंदोलनात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक,जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, भाजप किसान सेलचे अध्यक्ष भगवान काटे, जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजीराव माने रिपाईचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे , शहाजी कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

दुध संकलनावर परिणाम
जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी संघटनांसह भाजप व मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व ठिकठिकाणी निदर्शने केली. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसून आला.भाजप कडून १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार, किसान संघर्ष समितीबरोबरच भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष व रयत क्रांती संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाली. रयत क्रांती संघटनेने शुक्रवारी रात्रीच आष्टा-भिलवडी मार्गावर दुधाचा टँकर फोडला शनिवारी दिवसभर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते, ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडवले जात होते, तर काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून निषेध करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्या-जिल्ह्यांतील दूध संकलनावर याचा परिणाम झाला.

बातम्या आणखी आहेत...