आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वर्धा:भाजपकडून लॉकडाउनचे नियम धाब्यावर; भाजपच्या 53 पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

वर्धाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक नियमावली तयार करण्यात आली आहे. अशातच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी ५३ जणांविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाचे राजेश बकाने यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर करण्यात आली.सत्कार सोहळा जल्लोषात साजरा करण्याचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात दिनांक ५ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास करण्यात आले होते.भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात कार्यक्रम होत असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळताच रामनगर पोलिस स्टेशनला तहसीलदार यांनी माहिती दिली. या दिलेल्या माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी भाजपाचे कार्यालय गाठत होत असलेला कार्यक्रम उधळून लावत पोलीस शिपाई कमलेश बडे यांच्या तक्रारीवरुन भाजपचे पवन परियाल, प्रशांत इंगळे, गुंडडू कावळे, सुनीता ढवळे, मंजुषा दुधबडे, प्रशांत बुरले, नगर परिषद सदस्य निलेश किटे, विरु पांडे, नगर परिषद उपाध्यक्ष प्रदीप सिंग ठाकूर, श्रीधर देशमुख, शीतल डोंगरे, गिरीश कावळे, अशोक कलोडे यांच्यासह ४० पदाधिकारीसह कार्यकर्त्यांविरुद्ध जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कलम ३७ (१) (३) महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ ,जमाव बंदी कायदा अंतर्गत अ प क्रमांक ३४४ कलम १३५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामान्य व्यक्तींना कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास प्रशासनाकडून रीतसर परवानगी घ्यावी लागतात,परवानगी घेतल्यानंतरही कार्यक्रमात अनेक अडथळे निर्माण केले जाते,कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी दंड वसूल करण्यात येतो, मात्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या जल्लोषात सत्कार कार्यक्रम विना परवानगीने आयोजित करण्यात आला असता,आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे दिसून येत आहे.

कार्यक्रम घेणे चुकीचे 

 मला न विचारता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोना आजाराचा काळ असून,घेण्यात आलेला कार्यक्रम योग्य नव्हता,या संदर्भात माहिती घेत आहे.-शिरीष गोडे  जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्ष वर्धा

0