आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या भाजपने चिखलफेक पर्यटन सुरू केले आहे. त्यांच्याकडून सगळे छळकपट झाले. त्यांना जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे. मुळात सत्याला सामोरे जाण्यासाठी नैतिक धैर्य लागते. जर ते कोणाकडे नसेल तर एवढीच अपेक्षा करू शकतो, त्यांनी जे काही अवसान आहे ते गोळा करावे.
त्यांना धैर्य लाभो, ही सदिच्छा व्यक्त करतो, असे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत पत्रकार परिषदेत म्हणाले. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. सोमय्या यांचा बुधवारचा नांदेड जिल्हा रद्द झाल्याचा त्यांनी समाचार घेतला.
सावंत हे काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी नांदेड दौऱ्यावर आले होेते. पुढे बोलताना सावंत म्हणाले, केंद्र सरकारकडून उद्योगांना फायदा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची बिले संसदेत पारित केली जातात.
सुरुवातीपासून हे सरकार शेतकरीविरोधी आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी पंकजा मुंडे यांनी जनगणना अहवालाची नीती आयोगाकडे मागणी केली होती. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस असताना मागणी पूर्णा का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करत भाजप ओबीसींच्याही आरक्षणाविरोधात असल्याचा आरोप सावंत यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.