आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणाच्या सीबीआय तपासावर प्रतिक्रिया:फडणवीस म्हणाले - महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करायची गरज, तर राऊत म्हणतात - गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय निघाला तर दिल्लीपर्यंत जाईल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास आता सीबीआय करणार आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी हा निर्णय दिला. यावर भाजपाच्या किरीट सोमय्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांना राजीनामा मागितला आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले की, या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करायला हवे. तसेच राऊतांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणतात...

विरोधी पक्षांच्या आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटले की, मुंबई पोलिसांनी सुशांत मृत्यूप्रकरणी कायदेशीर काम केले. जे आरोप लावले जात आहेत, ते योग्य नाही. जे लोक सरकारमध्ये आहे, त्यांना कायदा माहिती आहे. मुंबई पोलिस कमिश्नर किंवा आपले अॅडवोकेट जनरल या निर्णयावर बोलू शकतात. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर मी प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.

पुढे राऊत म्हणाले की, गृहमंत्र्यांचा राजीनामा मागवला जात आहे. जर राजीनाम्याचा विषय निघाला तर ही गोष्ट दिल्लीला जाईल. आमच्या राज्यातील न्याय व्यवस्था देशात सर्वात चांगली आहे. कुणीही कायद्याच्या पुढे नाही.

फडणवीस म्हणतात...

देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.' न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय ! या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा !'

काय म्हणाले होते किरीट सोमय्या...

दरम्यान, माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले. 'महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलिस कमिश्नरांनी 2 महिने एफ आय आर न घेणे दुर्देवी आहे. सुशांत सिंग चा परिवार ला न्याय मिळेल' असे ट्विट त्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...